spot_img
spot_img
spot_img
spot_img

1 एप्रिलला सोलापुरात ‘यश लॅक्मे सलून’चा भव्य शुभारंभ; सौंदर्य सेवांमध्ये नवा मानदंड

1 एप्रिलला सोलापुरात ‘यश लॅक्मे सलून’चा भव्य शुभारंभ; सौंदर्य सेवांमध्ये नवा मानदंड

 

सोलापूर : शहरातील उद्योजक सुयश खानापुरे आणि सोनाली खानापुरे यांनी रियल इस्टेट व बांधकाम क्षेत्रात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता सौंदर्य क्षेत्रात दमदार एंट्री घेत ‘यश लॅक्मे सलून’ हा अत्याधुनिक उपक्रम सुरू केला आहे. या सलूनचा भव्य शुभारंभ १ एप्रिल रोजी सोलापुरात होत असून, यामुळे शहराच्या सौंदर्यविश्वात एक नवा अध्याय सुरू होत आहे.

 

लॅक्मे सलून (Lakmé Salon) हे देशातील अग्रगण्य व विश्वासार्ह ब्युटी ब्रँड म्हणून ओळखले जाते. ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या या साखळीने संपूर्ण भारतात आपली खास ओळख निर्माण केली आहे. हेअर कट, हेअर कलरिंग, स्किन केअर, फेशियल, ब्रायडल मेकअप तसेच आधुनिक ग्रूमिंग सेवा यासाठी लॅक्मे सलून प्रसिद्ध आहे.

 

‘यश लॅक्मे सलून’मध्ये ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्यासाठी प्रशिक्षित स्टायलिस्ट आणि ब्युटी एक्सपर्ट्स कार्यरत असणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन यामुळे ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.

 

देशातील १२५ हून अधिक शहरांमध्ये ४०० पेक्षा जास्त शाखांद्वारे सेवा देणाऱ्या या प्रतिष्ठित ब्रँडची सुविधा आता सोलापूरकरांसाठी उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना महानगरांप्रमाणेच अत्याधुनिक सौंदर्य सेवा आपल्या शहरातच मिळणार असून, यामुळे सोलापूरच्या विकासाला आणखी एक नवे परिमाण मिळणार आहे.

 

✨ “सोलापूरकरांनी या अत्याधुनिक सलूनचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आयोजक सुयश खानापुरे व सोनाली खानापुरे यांच्या कडून करण्यात आले आहे.

 

या पत्रकार परिषदेस उद्योजक सुयेश खानापुरे, सोनाली, खानापुरे, उद्योजक मयूर दरगड, लॅक्मे समूहाचे आदित्य पेठकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!