दक्षिण सोलापुर विधानसभेतील 5 ग्रामपंचायतींना 1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर
📍 दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर विधानसभेतील 5 ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींच्या बांधकामासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून 1 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे संबंधित 5 ग्रामपंचायतींच्या बांधकामासह आधुनिक व सुसज्ज प्रशासकीय सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल. तसेच ग्रामविकासाच्या कामांना अधिक गती मिळून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






