spot_img
spot_img
spot_img
spot_img

अनीश सहस्रबुद्धे यांची यंदाही ‘पंच’ म्हणून निवड!

अनीश सहस्रबुद्धे यांची यंदाही ‘पंच’ म्हणून निवड!

 

सोलापूर : सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरचे सुपुत्र आणि अनुभवी क्रिकेट पंच अनीश सहस्रबुद्धे यांची यंदाही २०२६ च्या आगामी आयपीएल (IPL) स्पर्धेसाठी पंच (Umpire) म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अंपायरिंगमध्ये सोलापूरची छाप: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये आता सोलापूरचा चेहरा मैदानावर निर्णय देताना दिसेल.

 

प्रदीर्घ अनुभव: अनीश सर गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी विविध स्तरांवरील सामन्यांमध्ये अचूक पंचगिरी केली आहे. त्यांच्या याच अनुभवाची दखल घेत बीसीसीआयने (BCCI) त्यांना आयपीएलच्या पॅनेलवर स्थान दिले आहे.

 

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या निवडीचे स्वागत केले असून, “ही निवड सोलापूरच्या आगामी खेळाडूंसाठी आणि पंचांसाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!