spot_img
spot_img
spot_img
spot_img

पदवीधर मतदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !

पदवीधर मतदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !

 

नीलम नगर MIDC, सोलापूर

 

आपल्या सोलापूर शहरातील नीलम नगर MIDC येथे पदवीधर मतदारांच्या नोंदणीसंदर्भात मार्गदर्शनपर बैठक संपन्न झाली. या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणीचे महत्त्व, प्रक्रिया आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराची जबाबदारी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

या बैठकीला परिसरातील पदवीधर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नवमतदार नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

 

लोकशाहीची खरी ताकद नागरिकांच्या सहभागात असते. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदाराने आपली नोंदणी करून मतदानाचा अधिकार बजावणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या पदवीधर बांधवांची मतदार नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करावी, असे आवाहनही यावेळी केले.

 

मतदार नोंदणी करा – लोकशाहीला बळ द्या!

नोंदणीची अंतिम तारीख : ६ नोव्हेंबर २०२५

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!