spot_img
spot_img
spot_img
spot_img

रक्तदानातून पवनपुत्रास वंदन

रक्तदानातून पवनपुत्रास वंदन

गीतगंगा सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

 

सोलापूर (दि. २) रक्ताला जात, धर्म किंवा पंथ नसतो; तो केवळ माणुसकीचा रंग असतो. विज्ञानाने मोठी प्रगती साधली असली तरी आजही प्रयोगशाळेत रक्ताचा एक थेंब कृत्रिमरीत्या तयार करता आलेला नाही. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. जिथे भक्ती असते, तिथे शक्ती असते आणि या शक्तीचा उपयोग माणुसकीच्या सेवेसाठी व्हावा, यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन सुप्रसिद्ध सरकारी वकील तथा सीबीआय कौन्सिल ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी केले.

 

ते गीतगंगा सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री. हनुमान जयंतीचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी गीतगंगा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व्यंकटेश कंची, सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, राजकुमार पाटील, प्रथमेश कोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, अशोक संकलेचा, चंद्रकांत कंची, नितीन शेजुळ, चन्नेश इंडी, रवी कोटा, विनायक मादम, चंद्रकांत जक्कन, राज कनकी, सचिन जाधव, रत्नाकर नक्का, सागर अतनुरे, पप्पू क्षीरसागर, सतीश सिरसुला, दत्तात्रय बडगु, फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, आकाश गायकवाड, संतोष गडगडे, कल्पना गडगडे, सुनीता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी 25 भाविकांनी रक्तदान करून माणुसकीचा जागर केला.

 

कार्यक्रमाचे स्वागत चंद्रकांत कंची यांनी केले, प्रास्ताविक व्यंकटेश कंची यांनी मांडले. सूत्रसंचालन स्वयंम कंची यांनी केले, तर आभार वेणूगोपाल उत्तूर यांनी केले.

 

फोटो ओळ: गीतगंगा सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. प्रदीपसिंह राजपूत, व्यंकटेश कंची, नितीन शेजुळ, चन्नेश इंडी, ज्ञानेश्वर म्याकल, अशोक संकलेचा, चंद्रकांत कंची, रवी कोटा, विनायक मादम, सागर अतनुरे, चंद्रकांत जक्कन, राज कनकी, सचिन जाधव, पप्पू क्षीरसागर आदी.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!