PCL चा Saturday Homework! ☀️
प्रिसिजन टीमसाठी आजचा शनिवार ठरला शिकण्याचा आणि भविष्यातील शाश्वत ऊर्जेकडे अधिक जवळून पाहण्याचा.
मंगळवेढा तालुक्यात सुमारे १०० एकर परिसरात उभारलेल्या प्रिसिजन कॅमशॉफ्टच्या २९ मेगावॅट सोलार प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी आज टीमने प्रकल्पाला भेट दिली.
या भेटीदरम्यान सोलार प्रकल्पाची रचना, वीज निर्मितीची प्रक्रिया आणि प्रकल्पाचे एकूण कामकाज याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रिसिजनची असलेली बांधिलकी या प्रकल्पातून स्पष्टपणे दिसून येते.
या प्रसंगी प्रकल्पावर काम करणारे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व व्यवस्थापन उपस्थित होते. या प्रकल्पाचे नेतृत्व कंपनीचे संचालक व मुख्य वित्त अधिकारी श्री. रवींद्र जोशी यांनी केले असून श्री. स्वप्निल कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या टीमने हा प्रकल्प विक्रमी कालावधीत पूर्ण केला.
या उपक्रमामुळे पीसीएलच्या हरित ऊर्जेच्या ध्येयाला अधिक बळ मिळणार असून कंपनीला दीर्घकालीन खर्च बचतीचाही महत्त्वाचा लाभ होणार आहे.
PCL’s Saturday Homework! ☀️
For the Precision team, this Saturday was dedicated to learning and gaining deeper insights into the future of sustainable energy.
A visit was organized to inaugurate Phase 2 of the 29 MW solar plant of Precision Camshafts Limited spread across ~100 acres in Mangalwedha taluka.
During the visit, the team gained detailed insights into the solar project’s design, power generation process, and overall operations. The initiative reflects Precision’s strong commitment towards clean energy and sustainable development.
The occasion was graced by company management and executives who worked on this project. The project was spearheaded by Mr. Ravindra Joshi (Director &Group CFO), and Mr. Swapnil Kulkarni, and was executed in record time. This initiative not only reinforces PCL’s green energy commitment but is also expected to deliver significant long-term cost benefits for the company.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






