spot_img
spot_img
spot_img
spot_img

निम्याहून अधिक एस.टी. बसस्थानकांचे फोन बंद; प्रवाशांची गैरसोय – ‘सुराज्य अभियान’चे विभाग नियंत्रकांना निवेदन

निम्याहून अधिक एस.टी. बसस्थानकांचे फोन बंद; प्रवाशांची गैरसोय – ‘सुराज्य अभियान’चे विभाग नियंत्रकांना निवेदन

सोलापूर : जिल्ह्यातील अनेक एस.टी. बसस्थानकांवरील संपर्क व्यवस्था ठप्प असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सूचना फलकावर दिलेले किंवा अधिकृत संकेतस्थळावर नमूद असलेले अनेक दूरध्वनी क्रमांक बंद असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संपर्क व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उद्योजक किशोर पुकाळे, आयकर सल्लागार अर्चना जोशी तसेच सुराज्य अभियानचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील अनेक एस.टी. बसस्थानकांवरील सूचना फलक किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेले संपर्क क्रमांक बंद असतात किंवा फोन केल्यानंतर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची वेळ, सेवा किंवा इतर आवश्यक माहिती मिळवताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

या संदर्भात यापूर्वी जानेवारी महिन्यातही प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पुन्हा एकदा निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात एस.टी. बसस्थानकांवरील हेल्पलाईन आणि संपर्क क्रमांक नियमितपणे कार्यरत ठेवणे, संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करणे तसेच प्रवाशांना वेळेत प्रतिसाद मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष आणि ठोस कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सुराज्य अभियानच्या वतीने देण्यात आला आहे.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!