spot_img
spot_img
spot_img
spot_img

विजापूर बायपास रोडवर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

विजापूर बायपास रोडवर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सोलापूर : विजापूर बायपास रोडजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कारची कंटेनरला जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे इमादुद्दीन बागवान (वय 18 वर्षे) आणि अमन निसार बागवान (वय 19 वर्षे) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इफ्तारनंतर दोन्ही तरुण चहा पिण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेले होते. त्याचवेळी विजापूर बायपास रोडजवळ त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!