spot_img
spot_img
spot_img
spot_img

योगी_राजेंद्र_नगर_माशाळ_वस्ती_येथे_मोठ्या_प्रमाणात_वृक्षतोड

#योगी_राजेंद्र_नगर_माशाळ_वस्ती_येथे_मोठ्या_प्रमाणात_वृक्षतोड

 

#उपमहापौर_ज्ञानेश्वरी_देवकर_यांच्या_हस्तक्षेपामुळे_तोड_थांबली

 

सोलापूर : शहरातील योगी राजेंद्र नगर परिसरातील माशाळ वस्ती येथे मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे सुरू असलेली वृक्षतोड तात्काळ थांबवण्यात आली.

 

स्थानिक नागरिकांकडून परिसरातील मोकळ्या जागेत मोठ्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमहापौर देवकर यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. तेथे मशीनच्या सहाय्याने झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांनी संबंधितांना कडक शब्दांत जाब विचारत वृक्षतोड त्वरित बंद करण्याचे आदेश दिले.

 

उपमहापौर देवकर यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित मशीन जप्त करण्याबाबत तसेच वृक्षतोडीत सहभागी असलेल्या संबंधित व्यक्ती, ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पर्यावरणाला हानी पोहोचवणारी अशी बेकायदेशीर वृक्षतोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून शहरातील मोकळ्या जागांमधील झाडांचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उपमहापौर देवकर यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे सुरू असलेली वृक्षतोड थांबवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!