spot_img
spot_img
spot_img
spot_img

*वुशू स्पर्धेत यशराज कबाडे यांची दमदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक*

*वुशू स्पर्धेत यशराज कबाडे यांची दमदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक*

 

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी येथील विद्यार्थी यशराज कबाडे यांनी शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ४८ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे त्यांची पुणे विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

यशराज कबाडे यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत ही कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

या यशासाठी प्रशिक्षक श्री. विनोद कबाडे व तेजमाला खबाले मॅडम, कोच श्री. फूलचंद जावळे सर, महाराष्ट्र विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पुष्कराज पाटील सर, योगेश उपळकर सर तसेच प्राचार्या के. डि.धावणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

 

यशराजच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष – डॉ. बी वाय यादव साहेब, उपाध्यक्ष – नंदन जगदाळे साहेब, सचिव – पी.टी. पाटील, सहसचिव – ए.पी. देबडवार, खजिनदार – जयकुमार शितोळे साहेब तसेच विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विभागीय स्पर्धेतही यशराजने उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की, चि. स्वप्नील सतीश पाठक (वय ९ वर्ष)...

ll श्री गणेशाय नमः ।। ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।। संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि...

हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!

🏥 हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!   आज हुबळी येथे मुरुसाविरमठ मेडिकल कॉलेज आणि K.L.E. हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!