spot_img
spot_img
spot_img
spot_img

वाकड्या दोडक्यावर शोधला ‘डिजिटल’ उपाय! पंढरपूरच्या तरुण शेतकऱ्याची बिग बास्केट, झोमॅटोला थेट विक्री

वाकड्या दोडक्यावर शोधला ‘डिजिटल’ उपाय! पंढरपूरच्या तरुण शेतकऱ्याची बिग बास्केट, झोमॅटोला थेट विक्री

 

सोलापूर – केवळ पुस्तकी शिक्षण मोठे नसून योग्य माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीतही उत्तम यश मिळवता येते, हे पंढरपूर तालुक्यातील शेवते येथील अवघ्या आठवी शिकलेल्या अमोल तुले या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून दोडका पिकात केलेल्या एका नव्या प्रयोगाने अमोल यांना तब्बल 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवून दिला आहे.

 

अमोल तुले यांनी सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने दोडक्याची लागवड केली होती. मात्र, यात 500 किलो उत्पादनापैकी तब्बल 200 किलो दोडके वाकडे यायचे. त्यामुळे बाजारात योग्य भाव न मिळाल्याने मोठे नुकसान होत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अमोल यांनी सोशल मीडियावर दोडका शेतीचे विविध व्हिडिओ पाहिले.

 

सोशल मीडियावरील संकल्पनेतून अमोल यांनी मांडव आणि दोऱ्यांच्या सहाय्याने दोडक्याच्या वेलींना वर जोडले. यामुळे वेलींच्या मुळांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू लागला आणि दोडके सरळ वाढू लागले. पूर्वी 500 किलोमागे 200 किलो वाकडे निघणारे दोडके आता केवळ 5 किलोच्या आत वाकडे निघत आहेत. यामुळे पिकाची गुणवत्ता प्रचंड सुधारली.

 

 

या लागवडीसाठी अमोल यांना अवघा 15 हजार रुपये खर्च आला होता. दर्जेदार आणि सरळ दोडका पिकल्याने त्यांनी स्थानिक बाजारात जाण्याऐवजी थेट ‘रिलायन्स मॉल’, ‘ॲमेझॉन’, ‘झोमॅटो’ आणि ‘बिग बास्केट’ यांसारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना दोडक्याचा पुरवठा सुरू केला. सध्या त्यांच्या या उत्कृष्ट गुणवत्तेच्या दोडक्याला प्रति किलो 40 ते 60 रुपये इतका चांगला दर मिळत आहे.

 

अवघ्या 15 हजार रुपयांचा खर्च वजा जाता अमोल तुले यांना या दोडक्याच्या शेतीतून 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करून अमोल यांनी साधलेली ही प्रगती तालुक्यातील इतर शेतकरी बांधवांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की, चि. स्वप्नील सतीश पाठक (वय ९ वर्ष)...

ll श्री गणेशाय नमः ।। ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।। संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि...

हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!

🏥 हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!   आज हुबळी येथे मुरुसाविरमठ मेडिकल कॉलेज आणि K.L.E. हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!