spot_img
spot_img
spot_img
spot_img

संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की, चि. स्वप्नील सतीश पाठक (वय ९ वर्ष) आणि कु. सान्वी सतीश पाठक (वय १० वर्ष) यांनी बालवयातच अध्यात्म आणि विद्येच्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे.

ll श्री गणेशाय नमः ।।

।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।

संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की, चि. स्वप्नील सतीश पाठक (वय ९ वर्ष) आणि कु. सान्वी सतीश पाठक (वय १० वर्ष) यांनी बालवयातच अध्यात्म आणि विद्येच्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे.

🌟 अध्यात्मिक उपलब्धी:• इयत्ता पहिलीत असतानाच संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता कंठस्थ केली.• गीता परिवारातर्फे ‘गीताव्रती’ पदवी व सुवर्णपदक प्राप्त.• ‘गीता विचक्षण’ या विभागामध्ये ‘श्लोकांक’ आणि ‘अवरोही’ या दोन्ही पदवी परीक्षा उत्तीर्ण.• सध्या ते ‘श्लोकार्थ’ परीक्षेसाठी सिद्धता करत आहेत.• कंठस्थ असलेली अन्य स्तोत्रे:श्रीमद्भगवद्गीतेसोबतच या दोघांना श्री विष्णुसहस्रनाम, श्री शिवतांडव स्तोत्र, श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री संकटनाशन गणेश स्तोत्र, हनुमान चालीसा, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक, श्री रामरक्षा आणि श्री शिव रुद्राष्टकम पूर्णतः मुखोद्गत आहेत.🙌

विशेष गौरव व सत्कार:✅ शृंगेरी दक्षिण पीठ कर्नाटक: श्री श्री परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व गौरव.✅ कुरुक्षेत्र: श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराज (कोषाध्यक्ष, अयोध्या राम मंदिर) यांच्या हस्ते सन्मान.✅ सोलापूर: आमदार मा. श्री. सुभाषबापू देशमुख यांच्याकडून घरी विशेष सदिच्छा भेट व सत्कार.✅ अक्कलकोट: श्री स्वामी समर्थ मंदिरात मा. श्री. अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार.✅ तसेच नवीन मराठी शाळा बार्शी व विविध शाळा, मान्यवर डॉक्टर्स आणि संस्थांतर्फे वेळोवेळी सन्मान.✅ ज्ञानसागर स्वर्गीय सागर राजू जाधव स्मृती प्रतिष्ठान कोपरगाव. (शिर्डी) येथे भव्य दिव्य सत्कार समारंभ✅ सोलापूर येथे वैकुंठवासी सौ राजश्री दत्तात्रय झिंबल यांच्या स्मरणार्थ श्रीमद् भगवद्गीता पारायण स्थळ:- सुंदर मल्टीपर्पज हॉल नेहरूनगर सोलापूर ✅ दिनांक 09/08/ 2026 रोजी पानगाव जवळील सुर्डी येथे “अखंड हरिनाम सप्ताह” यामध्ये श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण सान्वी व स्वप्नील पाठक यांच्याकडून संपन्न. ✅ आनंदाश्रम ज्ञानपीठ , श्री क्षेत्रआनंदवाडी, यावली, तालुका मोहोळ या ठिकाणी श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण. ✅ लातूर येथे केशवराज महाविद्यालय मध्ये श्रीमद् भगवद्गीतेतील अध्यायांची पठण व सत्कार ✅ योगेश्वर अधिष्ठान अँड चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्याकडून स्वप्निल व सानवी यांचा विशेष सत्कार समारंभ. स्वप्नीलची मुंज देखील श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या मंगल उपस्थितीत परभणी येथे संपन्न झाली, हे आमचे परमभाग्य!अशाच प्रकारे या दोन्ही बालकांवर ईश्वराची अखंड कृपा राहो, हीच श्री राधा-कृष्ण चरणी प्रार्थना! 🙏✨शुभेच्छुक:श्री. सतीश सुरेश पाठक व सौ. पल्लवी सतीश पाठक, बार्शी.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!

🏥 हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!   आज हुबळी येथे मुरुसाविरमठ मेडिकल कॉलेज आणि K.L.E. हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर...

कोई सर्जरी नहीं। कोई दवा नहीं। रिफ्लेक्सोलॉजी आजमाएं साइन अप करें और जीवन को बदलना शुरू करें!

कोई सर्जरी नहीं। कोई दवा नहीं। रिफ्लेक्सोलॉजी आजमाएं साइन अप करें और जीवन को बदलना शुरू करें!   चाहे आप रिफ्लेक्सोलॉजी में नए हों या अपने कौशल...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!