spot_img
spot_img
spot_img
spot_img

समर्थ स्वामीच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले ‘देवाभाऊ’

समर्थ स्वामीच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले ‘देवाभाऊ’

 

शासनाकडून मिळणार पाच लाखांची मदत : आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा

 

सोलापूर – भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज होऊन मृत पावलेल्या घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून ३ लाख ५० हजार रुपये तर विद्यार्थी अपघात अनुदान योजनेतून दीड लाख असे एकूण पाच लाख रुपयांची मदत शासनाकडून करण्यात येणार आहे. याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

 

घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी या विद्यार्थ्यास भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण होऊन त्याचा २३ जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळावी याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. वास्तविक पाहता रेबीजने मृत्यू होण्याच्या घटनेत एक लाख रुपये इतकी मदत करण्यात येते. परंतु आमदार देवेंद्र कोठे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरप्रस्ताव मागवून स्वामी कुटुंबीयांस ३ लाख ५० हजार रुपये इतकी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी अपघात अनुदान योजनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दीड लाख रुपये अशी एकूण पाच लाख रुपयांची मदत समर्थ स्वामी यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे.

 

नागरिकांच्या मदतीला देवाभाऊंचे सर्वोच्च प्राधान्य

 

राज्यातील विशेषतः सोलापुरातील सर्वसामान्य गरजू नागरिकांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. समर्थ स्वामी या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेषबाब म्हणून अधिकची मदत देण्याची विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मागणी करत ५ लाख रुपयांची मदत केली आहे. सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी आगामी काळातही गरज लागेल तेंव्हा अधिकाधिक मदत करण्यास कटिबध्द आहे.

 

— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की, चि. स्वप्नील सतीश पाठक (वय ९ वर्ष)...

ll श्री गणेशाय नमः ।। ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।। संस्कार आणि विद्येचा संगम! बार्शीच्या पाठक कुटुंबातील बालरत्नांची दैदिप्यमान कामगिरी! 📖✨आम्हास अत्यंत आनंद आणि...

हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!

🏥 हुबळीच्या आरोग्यसेवेत नवा अध्याय — KLE हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती!   आज हुबळी येथे मुरुसाविरमठ मेडिकल कॉलेज आणि K.L.E. हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!