Solapur News : दीड महिन्यांच्या चिमुरड्याचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप
सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या अवघ्या दीड महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
श्रीनाथ विकी मंजूळकर असे मृत बालकाचे नाव आहे. श्रीनाथला सर्दीचा त्रास असल्याने शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्याला मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्राथमिक तपासणीनंतर रक्त तपासणीसाठी रक्त काढत असताना बाळ जोरजोराने रडत होते. मात्र, त्यानंतर अचानक बाळ शांत झाले आणि कोणतीही हालचाल दिसत नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांना बोलावूनही सुमारे १५ मिनिटे जबाबदार डॉक्टर उपस्थित झाले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यानंतर बाळाला आयसी
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






