spot_img
spot_img
spot_img
spot_img

निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; बार्शीतील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; बार्शीतील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

 

बार्शी –

 

दुसऱ्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत बार्शी शहर पोलिस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. रविकिरण भोसले (भोसले हॉस्पिटल, परांडा रोड, बार्शी) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 304, वैद्यकीय व्यावसायिक कायदा कलम 33 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 1965 चे कलम 22 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम उमेश महानवर (वय 31, रा. बगले चाळ, सोलापूर रोड, बार्शी) यांना दुसऱ्या प्रसूतीसाठी 1 जानेवारी 2024 रोजी भोसले हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप त्यांच्या पती उमेश हरीभाऊ महानवर यांनी तक्रारीत केला आहे.

 

शस्त्रक्रियेनंतर सोनम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 7 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1.10 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेची बार्शी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे जबाब दिले. त्यानंतर वैद्यकीय अभिप्राय मिळण्यासाठी संबंधित कागदपत्रे सोलापूर येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठविण्यात आली होती. या प्रकरणातील वैद्यकीय अभिप्राय उशिरा प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी 1 सप्टेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल केला.

 

तक्रारीत डॉ. रविकिरण भोसले यांच्याकडे रिपीट सिझेरियनसारखी मोठी शस्त्रक्रिया करण्याची कायदेशीर पदवी नसतानाही शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कथित निष्काळजीपणामुळे सोनम महानवर यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक झालटे करीत आहेत. वैद्यकीय अभिप्राय, उपचारादरम्यानची कागदपत्रे आणि शस्त्रक्रियेशी संबंधित बाबींच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

 

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!