spot_img
spot_img
spot_img
spot_img

एसीएस हॉस्पिटलचा उपक्रम : हृदयविकारावरील उपचारांचे थेट प्रात्यक्षिक

एसीएस हॉस्पिटलचा उपक्रम : हृदयविकारावरील उपचारांचे थेट प्रात्यक्षिक

सोलापूर : एन्जोप्लास्टी म्हणजे काय, ती कशी केली जाते, स्टेंट कसा बसवला जातो यासह हृदयविकारावरील प्रगत उपचार पद्धतींची माहिती सोलापुरकरांना एसीएस हॉस्पिटलतर्फे देण्यात आली. शनिवारी आयएमए हॉल येथे हृदयविकारावरील प्रगत उपचारांबाबत जनजागृती प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते.

 

या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, आर.एम.ई.ए.चे अध्यक्ष नीलकंठ वाकचौरे व उद्योजक सुहास आदमाने यांच्या हस्ते झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी व्यासपीठावर डॉ. सुहासिनी शहा, डॉ. प्रमोद पवार, राहुल कारीमुंगी यांच्यासह डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. स्नेहल पवार, डॉ. रुची गांधी, डॉ. नेहा गायकवाड उपस्थित होते.

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना यतीन शहा म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय अचूकता येत नाही. हे ओळखून एसीएस हॉस्पिटलने सोलापुरात हृदयविकारावरील उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.”

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली हब्बा व अनिता नन्ना यांनी केले.

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!