spot_img
spot_img
spot_img
spot_img

महापालिका आयुक्त IAS डॉ. सचिन ओंबासे यांनी  दिली सार्वजनिक शौचालयांना भेट!

महापालिका आयुक्त IAS डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली सार्वजनिक शौचालयांना भेट!

 

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान मधुकर उपलप वस्ती, रामवाडी, मोदी, कुंभार गल्ली आणि लष्कर या परिसरांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती तपासण्यात आली.

 

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छालयांच्या दुरुस्ती व देखभाल कामांना वेग देण्यात आला असून, त्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळभेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी सफाई कामगार वेळेवर उपस्थित राहतात का, पाण्याचा पुरवठा नियमित आहे का, पाण्याचे टँकर वेळेवर पोहोचतात का, तसेच शौचालयांची स्वच्छता नियमित केली जाते का याबाबत सविस्तर माहिती घेतली. ड्रेनेज लाईन चोकअप होणार नाही याबद्दल विभागीय अधिकारी यांनी तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

 

पाहणीदरम्यान डॉ. ओम्बासे यांनी निर्देश दिले की, ज्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, पाण्याच्या टाक्या खराब झालेल्या आहेत किंवा पाण्याची व्यवस्था सुरळीत नाही, अशा ठिकाणांबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि त्या प्रस्तावाच्या आधारे आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत.

 

आयुक्तांनी नागरिकांच्या दैनंदिन वापराशी निगडित या महत्त्वाच्या सुविधांबाबत स्वच्छता, पाण्याची उपलब्धता आणि देखभाल यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.

 

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त विना पवार, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक वाहन अनिल चाराटे,तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक : राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!