spot_img
spot_img
spot_img
spot_img

सीना माढा उपसा सिंचन योजनेची पाणी चिंचोली पासून पुढे शिंदेवाडी, जाधववाडी,माढा, भांगे वस्ती पर्यंत तलाव व ओढयामध्ये सोडणेबाबत …. 

प्रति,

 

मा. तहसीलदार

माढा

 

विषय: सीना माढा उपसा सिंचन योजनेची पाणी चिंचोली पासून पुढे शिंदेवाडी, जाधववाडी,माढा, भांगे वस्ती पर्यंत तलाव व ओढयामध्ये सोडणेबाबत ….

 

 

अर्जदार: आम्ही खाली सह्या करणार सर्व नागरिक व शेतकरी

 

महोदय,

 

उपरोक्त विषयास अनुसरून, सीना माढा उपसा सिंचन योजनेतून चिंचोली पासून पुढे शिंदेवाडी,जाधववाडी ते मनकर्णा ओढा माढा-भांगे वस्ती पर्यंत चालू वर्षी आज अखेर पाणी सोडण्यात आलेले नाही. यासंदर्भात विवीध संघटना, पक्ष यांच्याकडून आंदोलने, उपोषण करण्यात आले परंतु पाटबंधारे विभागाकडील प्रशासनाने याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक अडचणीचे कारण सांगून पाणी सोडण्याबाबत निष्काळजीपणा केला आहे. उजनी धरण यावर्षी शंभर टक्के भरून देखील या भागातील जनतेचे हक्काचे पाणी न सोडल्यामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे.

 

याबाबत परिसरातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी बेजबाबदारपणे व दबावाखाली काम करत असल्याने स्पष्ट होत आहे.

 

मागील पंधरा दिवसांपुर्वी माढा व टेंभुर्णी येथील आंदोलनावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन देखील कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी आज अखेर झालेली नाही.

 

यावर्षी पर्जन्यमान अत्यल्प असल्याने पिण्यासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध नसून पाणी न सोडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.

 

हक्काच्या पाण्यासाठी माढा व परिसरातील जनतेवर अन्याय होत असल्याने चिंचोली येथुन भांगे वस्ती पर्यंत पाणी चालू करेपर्यंत व घाटणे, वडाची वाडी, वेताळवाडी, रणदिवेवाडी, शिंदेवाडी, जाधववाडी व माढा परिसरातील तळे तलाव भरणेची लेखी हमी मिळेपर्यंत उद्या गुरुवार,दि २७/०८/२०२६ रोजी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक माढा येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलन करीत आहोत.

 

आपणांस विनंती की, आपण योग्य त्या अधिकारी व कर्मचारी यांना रास्ता रोको आंदोलनाबाबत ताबडतोब लेखी स्वरूपात कळवावे व योग्य त्या कार्यवाही बाबत निर्देश द्यावेत.

 

सदरच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास व गोंधळ झाल्यास त्यास पाटबंधारे व महसूल प्रशासन जबाबदार असेल याची गंभीर नोंद घ्यावी

 

कळावे,

 

आपले विश्वासु,

 

 

प्रत माहिती सत्व व योग्य त्या कार्यवाही साठी

 

१. सहाय्यक पोलिस निरीक्षक,माढा पोलिस स्टेशन

२. मा.पोलिस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, सोलापूर

३ .मा.जिल्हाधिकारी, सोलापूर

४. मा. उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी

५. मा.कार्यकारी अभियंता , पाटबंधारे विभाग, सोलापूर

६.

 

७.

 

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!