spot_img
spot_img
spot_img
spot_img

४ थी महिला महाराष्ट्र केसरी २०२६’

४ थी महिला महाराष्ट्र केसरी २०२६’

 

पारंपरिक कुस्ती खेळ जपण्याबरोबर आपल्या मातीचासुद्धा मान वाढवूया : आमदार सचिन कल्याणशेट्टी

==================

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ : अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी !

===================

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –

 

महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धामुळे महिला कुस्तीला नवीन ओळख मिळत आहे. स्पर्धा सोलापुरात होत असल्याचा मोठा आनंद आहे. पारंपारिक खेळ जोपासण्याबरोबरच आपल्या मातीचा सुद्धा मान वाढवूया. कुस्तीमुळे शिस्त आणि जिद्द वाढते. कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात. कुस्ती आपल्या शरीराला ताकद देते शिवाय ऊर्जाही देते. कुस्तीमुळे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. कुस्तीमुळे आरोग्य आणि फिटनेस सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

निर्झरा केअर फाउंडेशनच्यावतीने संस्थापिका स्वाती अळळीमोरे – साखरे यांनी आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शनिवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापुरात महिला कुस्ती स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच खेळाडूंच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.

 

देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आज महिलांनी आपला झेंडा फडकवलेला आहे. कुस्ती क्षेत्रात सुद्धा आता महिला मागे राहिलेल्या नाहीत. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील आखाड्यात यावे, असे आवाहनही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.

 

यावेळी महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, हिंद केसरी योगेश दोडके,कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी, झेडपी सदस्य नेताजी खंडागळे, महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे सातारा, जिल्हाध्यक्ष कुस्ती सम्राट असलम काझी, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख बोरामणी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, महाभारत केसरी केसरी योगेश बोंबाळे, पुणे केसरी समीर कोळेकर, उमेश सूळ, कुस्ती निवेदक यु्वराज केचे,

यांच्यासह आयोजक स्वाती अळळीमोरे साखरे, उद्योजक सागर कत्ते, नगरसेवक गणेश वानकर, सुधीर थोबडे

भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, डॉ. शैलेश पाटील वानकर, पंच प्रमुख दिनेश गुंड, किसन मेकाले, भीमराव बाळगे, सोमनाथ पटणे, केदार विभुते, सोमनाथ अळळीमोरे, सुधा अळळीमोरे, मोहन पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

 

कै. सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ

महाराष्ट्र केसरी ७६ किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झाली. मध्यंतरास सोनाली २-० गुणाने आघाडीवर होती. त्यानंतर मात्र विजेतेपदाची दावेदार असलेल्या अपेक्षाने जोरदार मुसंडी मारत ६-३ गुणाने कुस्ती जिंकली.

शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत ५३ किलो गटात सोलापूरची शिवानी करचे हिने पुण्याच्या अवंती रानवडे हिला ६-५ असे हरवले.

===============

दुसऱ्या फेरीत पोहोचलेले गटनिहाय मल्ल :

 

५० किलो : तेजा मदने (छ. संभाजीनगर), तृप्ती गुरव (कोल्हापूर), आकांशा जाधव, अर्पिता गोळे (पुणे), भाग्यश्री मासुळे (धुळे), गौरी पाटील (कोल्हापूर), अनुष्का हासपे (सातारा), कोमल पटेल (ठाणे).

५३ किलो : श्रावणी लव्हटे (कोल्हापूर), दिव्या धावडे (अहिल्यानगर), सोनामिका पाटील (जळगाव), राजनंदिनी रनवरे (सातारा), मधुरा वाईंगडे (कोल्हापूर), तुळशी पाथरे (नाशिक शहर).

५५ किलो : समृद्धी निलवे (मुंबई उपनगर ).

५७ किलो : सलोनी खोपडे (पुणे), सिमरन कोरी (मुंबई उपनगर), तन्वी मगदूम (कोल्हापूर).

५९ किलो : धनश्री फंड (अहिल्यानगर), निर्मिती मुऱ्हे (पिंपरी चिंचवड), अमेघां घरत (रायगड).

६२ किलो : प्रगती गायकवाड (पिंपरी चिंचवड), संस्कृती शिरसाट (नाशिक), राधिका ढेरे, राधिका ढेरे (कोल्हापूर).

६५ किलो : दिव्या कुंभार,विशाखा चव्हाण ( पुणे ), अश्विनी गर्जे (बीड).

६८ किलो : शिवानी मेटकर (कोल्हापूर), आराधना नाईक (सांगली).

७२ किलो : सावरी सातकर (पुणे), वेदांतिका पवार (सातारा).

७६ किलो महाराष्ट्र केसरी गट : वेदिका ससाणे, सृष्टी भोसले (कोल्हापूर), प्रतीक्षा बागडी

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!