spot_img
spot_img
spot_img
spot_img

जयंती उत्सव काळात डॉल्बी व प्रखर प्लाझमा-बीम लाईट वापरावर बंदी : सोलापूर पोलीस आयुक्तांचे आदेश

जयंती उत्सव काळात डॉल्बी व प्रखर प्लाझमा-बीम लाईट वापरावर बंदी : सोलापूर पोलीस आयुक्तांचे आदेश

 

सोलापूर /प्रतिनिधी

:- माता रमाई जयंती (दि. 07 फेब्रुवारी) व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव (दि. 15 ते 19 फेब्रुवारी) निमित्त सोलापूर शहरात विविध मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव कालावधीत (दि. 07 ते 20 फेब्रुवारी 2026) मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांच्या आरोग्यास व सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये म्हणून डॉल्बी सिस्टीमचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

 

गतकाळात डॉल्बी सिस्टीममुळे काही नागरिकांना कान, छातीचे त्रास होऊन अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती. याबाबत जेष्ठ नागरिक व सामाजिक संघटनांनी निवेदने सादर करून डॉल्बी सिस्टीममुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163(1) प्रमाणे हा आदेश पोलीस आयुक्त, शहर एम. राजकुमार यांनी दिला आहे.

 

तसेच मिरवणुकीदरम्यान प्लाझमा बीम लाईट, लेझर लाईट यांचा प्रखर प्रकाश वाहन चालकांच्या डोळ्यांना दिपवून अपघात घडू शकतो, तसेच नागरिकांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता असल्याने या प्रकाशयंत्रणांवरही बंदी घालण्यात आली आहे.

 

सोलापूर शहरात या उत्सव काळात सुमारे 219 सार्वजनिक मंडळे स्थापन होत असून त्यापैकी 32 मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. मंडळांनी साऊंड सिस्टीमसोबत प्लाझमा व लेझर लाईटचा वापर टाळावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

 

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!