spot_img
spot_img
spot_img
spot_img

आमदार विजय देशमुख यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश..

आमदार विजय देशमुख यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश..

 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना दिलासा मिळावा, ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, कोणतीही बहीण लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आमदार विजय देशमुख यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. या प्रयत्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत अखेर लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेची मुदत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

 

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!