spot_img
spot_img
spot_img
spot_img

मनपा आयुक्तांची धडक पाहणी : प्रलंबित जन्म–मृत्यू–विवाह नोंदींच्या निपटाऱ्यासाठी कडक निर्देश

मनपा आयुक्तांची धडक पाहणी : प्रलंबित जन्म–मृत्यू–विवाह नोंदींच्या निपटाऱ्यासाठी कडक निर्देश

 

सोलापूर – मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज (15 नोव्हेंबर 2025) जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाची पाहणी केली. प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेताना आयुक्तांनी संबंधित विभागाला स्पष्ट सूचनाच दिल्या—प्रकरणांचा वेळेत निपटारा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा.

 

आयुक्तांनी रजिस्टर, नोंदी आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रियेचे परीक्षण करत कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता तपासली. नागरिकांच्या अर्जांना विलंब न होता सेवा द्यावी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेगाने व्हावा आणि कामकाजात शिस्त आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

या पाहणीवेळी उपायुक्त आशिष लोकरे, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी आणि डॉ. मंजिरी कुलकर्णी उपस्थित होते. आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे नोंदणी कार्यालयातील कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!