spot_img
spot_img
spot_img
spot_img

कुंभारी येथे अभिष्टचिंतन व भाजपा पक्षप्रवेश सोहळा संपन्न !

कुंभारी येथे अभिष्टचिंतन व भाजपा पक्षप्रवेश सोहळा संपन्न !

 

कुंभारी, सोलापूर

 

आपल्या अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील कुंभारी येथील काँग्रेसचे नेते कुंभारी श्री. अप्पासाहेब बिराजदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर आणि विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून जाहीर पक्षप्रवेश केला. यासोबतच त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच अनेक मान्यवरांनी अप्पासाहेबांचे अभिष्टचिंतन केले. तसेच, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात कुंभारी येथील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी सोहळ्यात पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना संघटन बळकट करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तसेच, गावाच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना यानिमित्ताने अधिक मजबूत झाली.

 

यावेळी श्री. शशिकांत चव्हाण, श्री. विकास वाघमारे, श्री. महेश बिराजदार, श्री. रामचंद्र होनराव, श्री. अण्णप्पा बाराचारे, श्री. शिरीष पाटील, श्री. आनंद तानवडे, श्री. बिपीन करजोळे, श्री. गेनसिद्ध गुंडे, श्री. इरेश कटारे, कुमारी श्रुतीताई निकंबे, श्री. राजशेखर कोरे, श्री. सागर तेली, श्री. बाळासाहेब कुलकर्णी, श्री. अप्पू थोंटे, श्री. धिरज छपेकर, श्री. श्रीशैल माळी, श्री. विरपाक्ष घेरडे, श्री. शब्बीर जमादार, श्री. प्रकाश करपे, श्री. वैभव हलसगे, श्री. सूरज पाटील, श्री. सचिन सुतार, श्री. महेश खसगे, श्री. सौदागर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

 

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!