spot_img
spot_img
spot_img
spot_img

श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील शासकीय योजनांचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आज उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे आणि डॉ. शिवरत्न शेटे यांची प्रमुख उपस्थिती

श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील शासकीय योजनांचे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आज उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे आणि डॉ. शिवरत्न शेटे यांची प्रमुख उपस्थिती

 

सोलापूर : श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजनेचे उद्घाटन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता रुग्णालयात होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी दिली. या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे आणि हिंदवी परिवाराचे प्रमुख ख्यातनाम शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

विशेषतः पूर्व भाग आणि एकूणच शहरात आर्थिक दुर्बल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळे रुग्णांचा विश्वास संपादन केलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजना नसल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात या शासकीय योजना सुरू व्हाव्यात याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर शासनाने श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनांचे उद्घाटन आज (शुक्रवारी) सकाळी होणार असून या कार्यक्रमास सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन यांनी केले आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!