📍भटके विमुक्त परिषद । मुंबई ।
भटके विमुक्त दिनाच्या औचित्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलच्या वतीने भटके विमुक्त परिषदेचे आयोजन राज्याचे कृषी मंत्री नामदार श्री.दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या परिषदेला मी उपस्थित राहून संबोधित केले.
व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.रविकांत राठोड यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी भटके विमुक्त जातीतील भरीव समाज कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, युवक प्रदेशाध्यक्ष श्री.निखिल ठाकरे, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.मानकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री.संतोष राजगुरू आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
व्हीजेएनटी सेलचे पदाधिकारी श्री.ठाकूरसिंग बावरी, श्री.आंबादास धनगर, श्री.सचिन जोरे, श्रीमती टिशाताई माडेवार, श्री.अशोक धनगावकर, श्री.गणेश धायडे, श्री.सुरेश धोत्रे, श्री.कल्याण राठोड आदींनी परिश्रम घेतले.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






