spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी-तेलुगू संस्कृतीचा सुंदर सेतू; ‘मराठीतून तेलुगू शिका’ उपक्रमाचा उत्साहात समारोप

मराठी-तेलुगू संस्कृतीचा सुंदर सेतू; ‘मराठीतून तेलुगू शिका’ उपक्रमाचा उत्साहात समारोप

 

सोलापूर : प्रतिनिधी

 

भाषेच्या भिंती ओलांडून दोन संस्कृतींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि हृदय स्पर्श बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठीतून शिका तेलुगू लिहायला आणि वाचायला’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठी आणि तेलुगू भाषिक समाजामध्ये संवाद, सांस्कृतिक ऐक्य आणि परस्पर स्नेह वाढवणारा हा उपक्रम सोलापुरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माणिक अंबाजी गुर्रम उपस्थित होते. तसेच ‘आधुनिक सारथी’चे संपादक श्रीनिवास बुरा, वाचनालयाचे संचालक अशोक इंदापुरे आणि अरविंद चिन्नी यांनी विशेष उपस्थिती लावली.

 

यावेळी बोलताना डॉ. माणिक गुर्रम म्हणाले की, “सोलापूर हे बहुभाषिक शहर असून अशा उपक्रमांमुळे समाजा-समाजातील संवाद अधिक दृढ होतो. भाषेचे ज्ञान हे केवळ संवादापुरते मर्यादित नसून ते मनांना जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे.” तर श्रीनिवास बुरा यांनी बदलत्या काळात दोन भाषांचे ज्ञान प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहे, यावर भाष्य केले.

 

कार्यक्रमात काशिनाथ गंजी यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अत्यंत रंजक आणि सहज शैलीत तेलुगू भाषेचे प्रशिक्षण दिले. तर डाक विभागातील कर्मचारी व सहाय्यक शिक्षक श्रीरंग रेगोटी यांनी तयार केलेल्या सोप्या स्टडी नोट्स आणि व्हॉट्सॲपद्वारे दिल्या जाणाऱ्या नियमित ‘डिजिटल होमवर्क’मुळे प्रशिक्षणार्थींना तेलुगू भाषा शिकणे अधिक सुलभ झाले. “भाषा शिकवताना चित्रपट दिग्दर्शकासारखी रंगत आणली गेली,” अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली. म्हणजे वर्गात व्याकरण कमी आणि उत्साह जास्त — त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थितीही ‘हाऊसफुल’च राहिली.

 

प्रशिक्षणार्थींच्या वतीने गोपीकृष्ण वड्डेपल्ली आणि बाबुराव म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गंजी सर आणि रेगोटी सरांनी जोडाक्षरे, उच्चार आणि लेखन पद्धती अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली. नोकरी-व्यवसाय सांभाळूनही या सुटसुटीत नियोजनामुळे आम्हाला तेलुगू भाषा आत्मसात करता आली.”

 

महिला प्रशिक्षणार्थी सुजाता चिप्पा आणि अंजली शिरसी यांनीही डिजिटल होमवर्क आणि अभ्यास नोट्सचे विशेष कौतुक केले. “घरबसल्या सराव करण्याची संधी मिळाल्याने दुसरी भाषा शिकण्याचा आत्मविश्वास वाढला,” असे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गौरीशंकर दिकोंडा यांनी आभार मानले, तर डॉ. अंजली शिरसी यांच्या वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्मदा गंजी, श्रीनिवास वंगारी, उमेश नक्का, सिद्धलिंगेश्वर विजापूरे, हरिदास पेंटा आणि रमा इप्पनपल्ली यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभिनव उपक्रमाचे सोलापूरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे..

 

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!