spot_img
spot_img
spot_img
spot_img

आज मुंबई येथील बीकेसी, वांद्रे (पूर्व) येथील एमएमआरडीए मैदानावर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते ‘महालक्ष्मी सरस’चे उद्घाटन तसेच ‘महालक्ष्मी सरस 2026’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज करण्यात आले. 

महालक्ष्मी सरस हे केवळ एक प्रदर्शन नसून ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांसाठी एक सक्षम आणि व्यापक व्यासपीठ आहे. येथे हस्तकला, हातमाग, खाद्यपदार्थ, पारंपरिक कला आणि घरगुती उत्पादने अशा विविध दर्जेदार वस्तूंचा समावेश असून, महिलांना त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून, स्वावलंबन आणि आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे.

यावेळी मंत्री मा. मंगलप्रभातजी लोढा, राज्यमंत्री मा. योगेशजी कदम, मुंबईच्या महापौर मा. रितूताई तावडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या उद्यमशीलतेला चालना देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

तुम्हीही महिला सक्षमीकरणाला हातभार लावण्यासाठी नक्की या!

दिनांक: २ मे ते १४ मे २०२६

ठिकाण: MMRDA मैदान, प्लॉट क्र. १ व २, ताटा पॉवर ऑफिस जवळ, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई

📍बांद्रा, मुंबई | 2 मे 2026

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!