spot_img
spot_img
spot_img
spot_img

ही संघटना आणि ट्युलिप हॉस्पिटल पत्रकारांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. – तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले 

ही संघटना आणि ट्युलिप हॉस्पिटल पत्रकारांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. – तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले

पंढरपुरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

 

“अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना नेहमीच पत्रकारांच्या आरोग्याशी निगडित कार्यात अग्रेसर राहिली आहे. आणि डॉक्टर प्रशांत निकम यांच्यासारखे सामाजिक बांधिलकी जपणारे लोक त्यात मोलाचे योगदान देत आहेत.” असे मत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केले. पंढरपुरात पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी देखील ट्युलिप हॉस्पिटल आणि संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ आणि ट्युलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार राजकुमार शहापूरकर या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत निकम, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतिश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार, जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर प्रशांत निकम यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले.

पंढरपूर व परिसरातील 60 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली. आवश्यकतेनुसार औषध उपचार देण्यात आले. तर 30 जणांचे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी करण्यात आले.

पत्रकार काम करत असताना त्यांच्या दैनंदिनीचे वेळापत्रक निश्चित नसते त्यामुळे त्यांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणूनच अशा आरोग्य शिबिरांची नितांत गरज आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ व ट्युलिप हॉस्पिटलचा हा उपक्रम म्हणूनच कौतुकास्पद आहे असे राजकुमार शहापूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, शहराध्यक्ष सोहन जयस्वाल, उपाध्यक्ष अजित देशपांडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश खंडेलवाल, ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ.किरण झिटे, डॉ. राहुल हजनाळे, डॉ. प्राची भोसले, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर संतोष कोकाटे, सर्व डॉक्टर आणि स्टाफ, तालुका आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, यांनी विशेष परिश्रम घेतले. रामकृष्ण भाले यांनी सुत्र संचालन केले तर प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!