spot_img
spot_img
spot_img
spot_img

कलारत्न पुरस्काराने अभिनेता, दिग्दर्शक महादेव जाधवर यांचा जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून सन्मान

कलारत्न पुरस्काराने अभिनेता, दिग्दर्शक महादेव जाधवर यांचा जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून सन्मान

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिल 2026 रोजी ध्येय जनस्वराज्याचे, मानवतेचे हक्काचे असे ब्रिदवाक्य असणारे जनस्वराज्य फाउंडेशन, पुणे यांच्याकडून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला जातो, असे जनस्वराज्य फाउंडेशनचे संचालक दशरथ उकिरडे यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जनसुराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने मौजे घारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी, सरपंच नंदकुमार काशीद, सूर्यकांत देशमुख, जनस्वराज्य फाउंडेशनचे संचालक दशरथ उकिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय, घारी येथे बार्शी तालुक्यातील अभिनेते दिग्दर्शक महादेव जाधवर यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये सामाजिक, तसेच वेगवेगळे जनकल्याणाचे विषय घेऊन शॉर्ट फिल्म, लघु नाटिका, नाटक, वेबसिरीज यावर काम करत असल्याने तसेच सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट गावगाडा ग्रामविकास यावर आधारित आहे, लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यांचे या कार्यास प्रोत्साहन म्हणून भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात मोफत कार्य करणाऱ्या मनीषा लोकरे यांना क्रीडारत्न, तसेच स्नेहल विधाते यांना कलारत्न, ॲड. अक्षय पाटील व मेजर दत्तात्रय मोरे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र डोके, पंचायत समिती सदस्य शरद बसवंत, सारंग जगदाळे, ग्रामसेवक दर्शन मंडलिक, समाजसेविका सुवर्णा शिवपुरे अश्विन गाढवे, राजाभाऊ वाघमारे, ॲड. मिलिंद बनसोडे, राधा घोंगणे, पूजा सातारकर, अबोली पालके भावना शहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल भालशंकर यांनी केले आभार ॲड. मिलिंद बनसोडे यांनी मानले.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!