spot_img
spot_img
spot_img
spot_img

सामान्य कुटुंबातील मुलीला राज्यसभेची संधी! 

सामान्य कुटुंबातील मुलीला राज्यसभेची संधी!

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी कुटुंबीयांसह मानले एकनाथ शिंदे यांचे आभार

सोलापूर : शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या कुटुंबीयांसह भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी वाघमारे कुटुंबाने उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.

संविधानाची प्रत आणि खास भेट

या भेटीदरम्यान वाघमारे कुटुंबाच्या वतीने एकनाथ शिंदे यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. तसेच, सोलापूरच्या एका स्थानिक कलाकाराने विशेष प्रेमाने रेखाटलेले शिंदे यांचे सुंदर चित्रही त्यांना भेट म्हणून अर्पण करण्यात आले.

Smart Solapurkar

भावूक झाल्या ज्योती वाघमारे

आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “एका मागासवर्गीय आणि अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या, परंतु उच्च शिक्षण व समाजकार्यातून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या आमच्यासारख्या घरातील मुलीला राज्यसभेवर संधी देणे, हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे. साहेबांनी दाखवलेला हा विश्वास आमच्यासाठी केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभर जपण्यासारखी जबाबदारी आहे.”

Smart Solapurkar

लाडक्या भावाचे मानले आभार

महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाला भेटून आम्ही संपूर्ण कुटुंब भावूक झालो होतो. एका सामान्य कुटुंबातील कर्तृत्वाला न्याय दिल्याबद्दल डोळ्यांत आनंदाश्रू घेऊन आम्ही साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!