spot_img
spot_img
spot_img
spot_img

विभागीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा; मूलभूत सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांचे महापौरांचे निर्देश

 

सोलापूर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ च्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका अकोलवार, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक आरोग्य) वेंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील विविध मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला.

बैठकीत विशेषतः रस्ते दुरुस्तीच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. अनेक भागांत खड्ड्यांची समस्या आहे ते दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच काही भागांत घंटागाडी नियमित जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत व वेळेवर ठेवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.शहरातील काही भागांत वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून निश्चित वेळापत्रकानुसार पाणी देण्यात यावे, गळती दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत आणि अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश देण्यात आले.याशिवाय ड्रेनेज लाईन तुंबणे, स्ट्रीट लाईट बंद असणे, मोकाट जनावरांचा त्रास, पथदिव्यांची देखभाल, उद्यानांची स्वच्छता, नालेसफाई, डास निर्मूलन फवारणी, तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली. नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे महापौरांनी स्पष्ट केले.

विभागीय अधिकाऱ्यांनी कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी डंपर, जेसीबी, जटींग मशीन तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देऊन समन्वयाने काम करावे व शहरातील सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जबाबदारीने पुरवाव्यात, असे आवाहन महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी यावेळी केले.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

.

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!