spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात डिजिटल क्रांती घडविणाऱ्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) आधारित एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ सोलापुरात उत्साहात पार पडला. रोख रकमेविना, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा देणारा हा उपक्रम प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ महापौर मा. श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक प्रशांत पल्ली, विभागीय यंत्र अभियंता शितल बिराजदार परशुराम नकाते (विभागीय वाहतूक अधिकारी), मा. श्री. मा. श्री. नागेश जाधव (आगार व्यवस्थापक), मा श्री सांख्यिकी अधिकारी कोलगे साहेब, स्थानक प्रमुख मल्लिनाथ अंजोटगी, वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे, मा. श्री. विनोद भोसले, एबिक्स कॅश चे सर्वेश घाडगे, महेश कस्तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे स्मार्ट कार्ड RuPay Prepaid प्लॅटिनम स्वरूपात उपलब्ध असून NCMC प्रणालीवर आधारित आहे. या कार्डच्या माध्यमातून एस.टी. प्रवास अधिक वेगवान, पारदर्शक व सुरक्षित होणार असून भविष्यात इतर डिजिटल व्यवहारांसाठीही याचा उपयोग करता येणार आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी व पत्रकार यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.यावेळी बोलताना महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, “डिजिटल व्यवहारांना चालना देत एस.टी. प्रवास अधिक आधुनिक करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. सोलापूर शहर डिजिटल परिवर्तनात अग्रेसर राहील.”तसेच त्यांनी नागरिकांना आव्हान केले की, “सर्व एस.टी. प्रवाशांनी स्मार्ट कार्डचा जास्तीत जास्त वापर करून रोखविरहित व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे आणि डिजिटल भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे.”कार्यक्रमाचे आयोजन अभिष्री एंटरप्रायझेस अँड ट्रेडर्स, चे श्रीकांत सड्डू, संतोष चव्हाण, आदम बागवान यांच्या वतीने करण्यात आले. EBIXCASH व HJR Enterprises, मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

मल्लिनाथ शंकर शाबादी

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!