spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापुरात पार पडला भक्तीमय वातावरणात भव्य गोल रिंगण सोहळा 

सोलापुरात पार पडला भक्तीमय वातावरणात भव्य गोल रिंगण सोहळा

 

माघवारी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापुरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचा भव्य गोल रिंगण सोहळा भक्तिभावाने पार पडला. 200 वर्षांहून अधिक काळाची वारी परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात जपली गेली.24 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता 33 दिंडी, परिसरातील 25 दिंडी व 25 भजनी मंडळांच्या उपस्थितीत पालखी सोहळा “ज्ञानोबा तुकाराम” जयघोषात सोलापुरातील नॉर्थकोट प्रशाला मैदान, पार्क चौक येथे पोहोचला. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने गोल रिंगण लावण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करून चोपदारांचा सन्मान करण्यात आला.ध्वजधारी रिंगणाने सुरुवात होऊन पारंपरिक रिंगणानंतर अश्व रिंगणाने सोहळ्याची सांगता झाली. हजारो भाविकांनी या सोहळ्याचा भक्तिभावाने अनुभव घेतला. हा रिंगण सोहळा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!