spot_img
spot_img
spot_img
spot_img

माजी आमदाराच्या कन्येचा अवघ्या दीडशे रुपयांत विवाह

माजी आमदाराच्या कन्येचा अवघ्या दीडशे रुपयांत विवाह

 

राज्यात लग्नसराईत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असताना, सोलापूरचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी समाजासमोर वेगळाच आदर्श ठेवला आहे. त्यांनी आपल्या कन्येचा विवाह नोंदणी पद्धतीने केवळ १५० रुपयांत पार पाडला.

 

कोणताही थाट-माट, खर्चिक समारंभ किंवा दिखावा न करता जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह संपन्न झाला. सावंत यांची कन्या सुषमा आणि पाणीपुरवठा विभागातील शासकीय अभियंता शुभम शिंदे या दोन्ही उच्चशिक्षित वधू-वरांनी साधेपणाला प्राधान्य देत सहजीवनाची सुरुवात केली.

विशेष म्हणजे, विवाहात बडेजाव न करता वाचलेला खर्च विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षण व कल्याणासाठी देण्यात आला आहे.

 

या निर्णयामुळे राजकारणातही एक सकारात्मक व अनुकरणीय संदेश गेला आहे.

 

राज्यभरातून या विवाह सोहळ्याचे कौतुक होत असून, वाढत्या लग्नखर्चाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह समाजाला विचार करायला लावणारा ठरत आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!