spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार विजय देशमुख यांची आयुक्तांसमवेत सविस्तर बैठक

दिनांक ३/१२/२५

 

सोलापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार विजय देशमुख यांची आयुक्तांसमवेत सविस्तर बैठक

 

सोलापूर शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासोबत सर्वसमावेशक बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला.

 

१.सोलापूर शहरातील सुरू असलेली दोन उड्डाणपुलांची कामे अतिशय मंद गतीने सुरू असल्याबद्दल आमदार विजय देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता कामाचा वेग वाढवून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

२.सोलापूर शहरातील मुख्य चौकांवर १० ते १५ लहान मुले भिक मागताना दिसत असून, ही मुले नेमकी कुठून येतात व कोण त्यांना भिक मागण्यास प्रवृत्त करते याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना बाल संगोपन केंद्रात दाखल करण्याची कार्यवाही करण्यावर आमदारांनी भर दिला.

३.बुधवार पेठ म्युनिसिपल कॉलनीतील इमारतींची स्थिती अत्यंत जीर्ण असल्याने आणि अलीकडेच बी-बिल्डिंगचा पॅराफिट कोसळल्याच्या घटनेनंतर रहिवाशांचे पुनर्वसन तातडीचे झाले आहे. या कामाची प्रगती, रहिवाशांच्या स्थलांतराची कार्यवाही अद्याप कोणत्या टप्प्यावर आहे आणि हे काम नेमके कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडून तपशीलवार चौकशी केली आहे.

४.हुतात्मा बागेतील मुलांची खेळणी व विरंगुळा सुविधा काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची गंभीर नोंद घेत, सर्व सुविधा तातडीने पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले. आधुनिक खेळणी, वृद्धांसाठी अधिक बाके, प्रकाशयोजना, स्वच्छता-सुरक्षा आणि पायवाटांचे सुशोभीकरण यावर निर्णय घेण्यात आला.

५.तसेच रविवार पेठ येथील २५६ गाळा वसाहतींच्या पुनर्वसनाबाबत १७ एप्रिल रोजी झालेल्या पाहणीसह तातडीच्या गृहबांधणीची प्रगती कुठपर्यंत आली आहे याबाबत आमदारांनी आयुक्तांकडून सविस्तर माहिती मागवली व आवास योजनेंतर्गत नवी घरे त्वरीत उभारण्याचा पुनरुच्चार केला.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*   बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि...

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!