spot_img
spot_img
spot_img
spot_img

Anjali Damania On Ajit Pawar | राज्यात आणखी एका मोठ्या 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला आहे, ज्याच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केला आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील 580 बेडचे शताब्दी हॉस्पिटल, जे BMC ने बांधले, ते सर्व विरोधांना डावलून PPP (Public-Private Partnership) तत्त्वावर देण्याचा घाट घालण्यात आला. आणि विशेष म्हणजे, हे हॉस्पिटल अजित पवारांचे मेहुणे व माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या ‘तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ने बोली लावून मिळवले आहे.दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत थेट आरोप केला आहे की, “आरएसएस (RSS) च्या हॉस्पिटलजवळच असलेले हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केले जात आहे.” त्यांनी मुख्यमंत्री (तत्कालीन) फडणवीस यांना उद्देशून ‘एकदाचा अख्खा महाराष्ट्र या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा’ असे तिखट वक्तव्य केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि यामागील राजकीय कनेक्शन जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ

 

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!