spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोलापूर जिल्हा उमेद स्वयंसहाय्यता गट उत्पादनांचे पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करणाऱ्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृहाचे सोलापूर येथे आज उद्घाटन – लोकार्पण केले.

सोलापूर जिल्हा उमेद स्वयंसहाय्यता गट उत्पादनांचे पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करणाऱ्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृहाचे सोलापूर येथे आज उद्घाटन – लोकार्पण केले.

 

यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जगंम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी’ संदीप कोहिनकर यांच्यासह इतर मान्यवर व उमेद स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला- भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

 

“महिला बचत गटांच्या हातातून तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या मिनी शॉपिंग मॉलचे उद्दिष्ट आहे. यातून त्यांच्या परिश्रमाला योग्य सन्मान मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती होते.”

एकंदरीत हि एक सामाजिक आणि आर्थिक चळवळ बनली आहे. याला राज्यभरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, या निमित्ताने ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद दिसत आहे.ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने (उमेद) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.उमेदच्या माध्यमातून हजारो महिला स्वयंसहायता गटांनी (बचत गट) तयार केलेल्या उत्पादनांसाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

याचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे.अनेकदा चांगल्या वस्तू बनवूनही योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून ‘उमेद’ने हा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामुळे महिलांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येत आहे.

या रुक्मिणी शॉपिंग मॉल व उपहारगृहात महिलांनी हाताने बनवलेले फराळाचे पदार्थ, सुकामेवा विविध प्रकारचे मसाले, याशिवाय,खवय्यांसाठी जेवण सुद्धा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोठे उमेद मॉल उभे करण्याचा संकल्प केला आहे.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!