spot_img
spot_img
spot_img
spot_img

डॉ.संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूने राज्यभर खळबळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

डॉ.संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूने राज्यभर खळबळ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

 

बीड :

बीड जिल्ह्यातील मौजे कोठारबन (ता. वडवणी) येथील रहिवासी डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. फलटण येथे घडलेल्या या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे.

 

या प्रकरणात काही राजकीय पदाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून, घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी राज्यभरातून मागणी होत आहे. बीड जिल्ह्यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत.

 

डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना न्याय मिळावा, या मागणीचे निवेदन आज आमदार विजयसिंह पंडित यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांना सादर केले.

कोकण विभाग उपसंपादक अनंत गावडे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!