spot_img
spot_img
spot_img
spot_img

जिसके हाथ मे लाठी उसका भैंस!! 

जिसके हाथ मे लाठी उसका भैंस!!

 

अक्कलकोट शहरातील मंगरूळे बायपास चौक ते कारंजा चौक या रस्त्याचे काम गेल्या जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. मंगरुळे चौक एवन चौक या भागाच्या रस्त्याचे हाती घेतलेले काम दहा महिन्यानंतर ही अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्याचे ठेकेदार जे नागरिक जाब विचारतात त्यांच्या घरासमोर खड्डे वगैरे न मारता व्यवस्थित लवकर काम उरकून भरावा वगैरे करून रस्ता नीट करून देतात. या उलट जे कोणत्याही तक्रारी करत नाहीत त्यांच्या दुकान आणि हॉटेल समोरची जागा खड्डे मारून आठ ते दहा दिवस तसेच सणासुदीचा किंवा त्यांच्या ऐन गर्दीच्या हंगामात तसेच ठेवून ठेकेदार जातात. असाच प्रकार या दिवाळीच्या प्रचंड गर्दीत वृंदावन हॉटेल समोर मागच्या दहा दिवसापासून मारलेले खड्डे बुजवले गेले नाहीत. ऐन गर्दीच्या काळात व्यवसायिकांना नाहक त्रास देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. जाब न विचारणाऱ्यांना गैरसोय करून प्रचंड त्रास देणे आणि जाब विचारणाऱ्यांना घाबरून त्यांचे काम तातडीने करून देणे असा प्रकार सर्रास सुरू आहे. अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या जाणीवपूर्वक लक्ष घालून संबंधित ठेकेदारांना सूचना देऊन कोणत्याही व्यापाऱ्यांना किंवा व्यवसायिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जावी अशी रास्त अपेक्षा शहरवासिय व्यक्त करत आहे.

दक्षता प्रतिनिधी कोकण विभाग : अनंत शशिकांत गावडे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!