spot_img
spot_img
spot_img
spot_img

दिवाळीनंतर सोलापूरमध्ये स्वच्छतेची मोठी मोहीम — 48 टन कचरा उचलला

दिवाळीनंतर सोलापूरमध्ये स्वच्छतेची मोठी मोहीम — 48 टन कचरा उचलला

 

सोलापूर :

दिवाळी सणानंतर शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मधला मारुती चौक, कोतम चौक, 70 फूट रोड, रेल्वे स्टेशन परिसर अशा प्रमुख भागांत सणानिमित्त उभारण्यात आलेल्या स्टॉल्समुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता.

 

महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत आज सकाळपासून या सर्व भागांमध्ये कचरा संकलनाचे काम सुरू करण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व रस्त्यांची स्वच्छता पूर्ण करून एकूण 48 टन कचरा संकलित करून उचलण्यात आला.

 

या उपक्रमात घनकचरा विभागाचे सहआयुक्त शशिकांत भोसले यांच्या अधिपत्याखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी व यंत्रणा यांनी मनापासून सहभाग घेतला.

 

महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणा खाली ही स्वच्छता मोहीम पार पडली.

 

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “दिवाळीनंतर निर्माण होणारा कचरा रस्त्यावर न टाकता निर्धारित ठिकाणी द्यावा व स्वच्छतेस सहकार्य करावे. सणाचा आनंद घेत असतानाच स्वच्छ सोलापूर घडविण्यात प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा,” असेही त्यांनी सांगितले.

 

फोटो – कामाआधी 

         कामानंतरचे  

Solapur Municipal Corporation, Solapur

Jaykumar Gore

 

 

उपसंपादक : राजन क्षत्रिय

Previous article
Next article

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!