spot_img
spot_img
spot_img
spot_img

पानगांव येथील बार्शी सोलापूर रोडवर असलेल्या खंडोबा नगर वैकुंठ स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने पाण्याचे बोरवेल व झाडांचे नाश दोष करून मोठे नुकसान केले.

बार्शी तालुक्यातील पानगांव येथील बार्शी सोलापूर रोडवर असलेल्या खंडोबा नगर वैकुंठ स्मशानभूमीत लावण्यात आलेल्या वृक्षांच्या फांद्या तसेच मोठे वृक्ष अज्ञात व्यक्ती कडून तोडण्यात आली आहेत तसेच रविवारी सकाळी सर्व वृक्ष प्रेमींनी स्मशान भूमी परिसर स्वच्छ करून सर्व निघून गेले असता दुपारच्या वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दहा ते पंधरा फुट उंच असलेली झाडे मध्यभागातून तोडून टाकण्यात आली. यापूर्वी हि अनेक वेळा स्मशानभूमीत नासधूस केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लोकसहभागातून झाडांना पाणी देण्यासाठी पाडण्यात आलेल्या बोअरवेल च्या पाईपवर दगड घालून फोडण्यात आले आहे. त्यामुळे स्मशान भूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते पिंटू नाईकवाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे

उपसंपादक : पिंटू नाईकवाडी

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!