खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या किंमतीच्या नावाखाली रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट होतेय का? महाराष्ट्र FDA च्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या काही आकडेवारीने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रुग्णांना सलाईन देण्यासाठी वापरला जाणारा IV Infusion Set कंपनीकडून सुमारे ₹11.05 ला मिळतो, तर काही ठिकाणी त्याची रुग्णांकडून ₹325 पर्यंत आकारणी झाल्याचे FDA च्या निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. तसेच कॅथेटरसारख्या वैद्यकीय उपकरणांच्या किंमतीतही मोठी तफावत आढळल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकार आणि National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) कडे वैद्यकीय उपकरणांच्या किंमती, खरेदी किंमत आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या दरांबाबत स्पष्ट नियम करण्याची मागणी केली आहे.
मुख्य संपादक : दत्ता सुरवसे






