📍जिल्हा नियोजन समिती सभागृह, सोलापूर
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन!
अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य गरजांचा आज सविस्तर आढावा घेतला.
उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध आणि काटकसरीने वापर करताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. प्रत्येक भागातील पाण्याची उपलब्धता आणि गरज लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करावे, संभाव्य टंचाईची ठिकाणे आधीच निश्चित करून आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवाव्यात तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयाने आणि सतर्कतेने कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






