दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम आणि शेतकरी बांधवांना सहन करावे लागलेले नुकसान प्रत्यक्ष जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती घेतली तसेच वस्तुस्थितीचा आढावा घेतला.
अशा संकटाच्या काळात बळीराजाला दिलासा देणे आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना आवश्यक तो दिलासा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय






