spot_img
spot_img
spot_img
spot_img

सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

*सरपंच द पावर मॅन हा मराठी चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार*

 

बार्शी : सरपंच म्हणजे आजची युवा शक्ती, आणि युवा शक्ती म्हणजे गावाचा विकास आहे. सरपंच हे सर्वांच्या जिव्हाळ्याचं, आदराने उच्चारले जाणारे नाव आहे. सरपंच म्हणजे विश्वास गावातील सर्व नागरिकांचा, सरपंच म्हणजे आत्मीयता, सरपंच म्हणजे गावातील अडचणी दूर करून सुख शांती आणणारा जननायक प्रथम पुरुष, सरपंच म्हणजे त्या गावाचा सिंघम, सरपंच द पावर मॅन हीच संकल्पना प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे असे मुख्य अभिनेता, दिग्दर्शक महादेव जाधवर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असणारे अभिनेत्री कशिश पाटील व सरपंच भुमिकेत असणारे अभिनेता महादेव जाधवर या दोघांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांना महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पाटलांचा बैलगाडा, पावणं जेवला का अशा अनेक गाण्याने ताल धरायला लावणारी ठसकेबाज सुप्रसिद्ध गायिका राधा खुडे यांनी वेगळ्या अंदाजात नवीन आयटम साँग संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल असे गायले आहे. या चित्रपटात अतिशय सुंदर असे लव्ह सॉंग नायक नायिका यांची जबरदस्त केमिस्ट्री गोऱ्या गोऱ्या पायात, चांदीचे पैंजण या गाण्यातुन तसेच विवेक नाईक यांच्या रांगड्या आवाजातील टायटल सॉंग सरपंच हे गाणे सर्वांसाठी उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. लवकरच या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच हा सामाजिक विषयावर एक ॲक्शन पॅक चित्रपट असल्याने त्यामध्ये हिरो, हिरोईन, विलन यांचा ॲक्शन धमाका एक वेगळा अनुभव म्हणून पाहायला मिळणार आहे.

तसेच या चित्रपटामध्ये विलनच्या रोलमध्ये पुणे येथील बाळासाहेब काटे, प्रशांत आवंढे तसेच सुरज भालशंकर, कृष्णा गव्हाणे, विजय काकडे, भारत पवार, प्रमोद माळी यांचे बरोबर अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या रोलमध्ये आपल्या अभिनयाची जबरदस्त छाप सोडलेली आहे. या चित्रपटांमध्ये बॉलीवूड तसेच साउथ इंडस्ट्रीप्रमाणे ॲक्शन तसेच सीजीआय / व्ही एफ एक्स पाहायला मिळणार आहेत.

या चित्रपटामध्ये ॲक्शन बरोबरच सामाजिक विषय, गावाचा विकास, लोकहित, बंधुप्रेम, माया, तसेच प्रेम हा विषय ही दिग्दर्शक महादेव जाधवर व प्रशांत जाधवर यांनी व्यवस्थितपणे मांडला आहे.

23 ऑक्टोबर 2026 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!