spot_img
spot_img
spot_img
spot_img

शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान

*शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान*

बार्शी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी येथील शिक्षकांचा त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांमुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला विशेष अधोरेखित झाले आहे.

 

लायन्स क्लब बार्शी युनिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘राष्ट्र शिल्पकार पुरस्कार’ महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे यांना बार्शी येथे प्रदान करण्यात आला. तसेच स्व. सुखदेव साखरे स्मृती पुरस्कार राजुरी, ता. करमाळा येथे त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

 

तसेच लायन्स इंटरनॅशनल प्रिती रंजन रिजन-१ यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सोलापूर येथे आयोजित शिक्षक सत्कार समारंभात महाराष्ट्र विद्यालयात कार्यरत प्रा. रविराज पाटील, प्रा. ज्योती डमरे व सहशिक्षक श्री. योगेश उपळकर यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कर्नल प्रकाश महानवर व श्री. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

याचबरोबर नवनिर्भय प्रतिष्ठान सोशल फाउंडेशन यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यालयातील श्री. सचिन देशमुख यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

 

शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे घटक असून, विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, मूल्ये, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते सातत्याने करीत असतात. शिक्षकांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या सन्मानामुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव झाला आहे.

 

पुरस्कारप्राप्त सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री. एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. पी. टी. पाटील, सहसचिव श्री. ए. पी. देबडवार, खजिनदार श्री. जे. सी. शितोळे, शाळा समिती सदस्य डॉ. सौ. मीराताई यादव, श्री. एस. बी. शेळवणे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य , संस्था सदस्यांनी व मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक श्री. आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे, पर्यवेक्षक श्री. के. जी. मदने यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!