spot_img
spot_img
spot_img
spot_img

मराठी उद्योजक नियमितपणे एकत्र आले तर खूप मोठे परिवर्तन होईल. 

मराठी उद्योजक नियमितपणे एकत्र आले तर खूप मोठे परिवर्तन होईल.

 

गेली 70 वर्ष फक्त नोकऱ्या आणि नोकरीची मानसिकता यामुळे मराठी म्हणून आपल्याला खूप पीछेहाट सहन करावी लागेल.

 

पण आता खूप सारी तरुण मुले उद्योगात येत आहेत खूप सारे मराठी उद्योजक यशस्वीपणे वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम करत आहेत. हे सर्वजण नियमितपणे एकत्र आले एकमेकांना मदत केली, नव्या उद्योजकांना दिशा दिली प्रशिक्षण दिले तर यातून मोठ्या प्रमाणात मराठी उद्योजकता विकास होईल.

 

समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मुंबई पुण्यातून याची सुरुवात केली आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स

 

21 एप्रिल दादर

22 एप्रिल पालघर

28 एप्रिल चारकोप

 

लवकरच पुणे येथील तारीख कळवतो

समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स च्या उद्योजकांच्या शाखा आपण सुरू करत आहोत त्या त्या उद्योजकांनी सातत्याने एकत्र येऊन एकमेकांना भेटलं आणि अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा किंवा अन्य विभागामध्ये बैठकीला जाऊन तिथल्या ओळखी करून घेणे यातून प्रत्येकाचा व्यवसाय वाढायला मदत होईल. याचबरोबर मराठी माणसांची मानसिकता मराठी उद्योजकांकडून खरेदी करावी किंवा सर्विसेस मराठी उद्योजकांकडून घ्याव्यात अशा स्वरूपाची बनवण्याकरता एक व्यापक जनजागृती अभियान शिवस्वराज्य मराठी संघटनेच्या माध्यमातून आपण सुरू केले आहे.

 

जे मोठे व्यवसायिक आहेत त्यांनी समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, अर्जुन छोटे उद्योजक आहेत त्यांनी शिवस्वराज्य मराठी उद्योजक समूह सक्रिय मावळे म्हणून सहभागी व्हा. जे नव्याने उद्योजक म्हणून सहभागी होत आहे त्यांनी नवउद्योजक म्हणून सांगा या तीन कॅटेगरीमध्ये आपण काम करत आहोत आणि जो उद्योग करत नाहीत परंतु आम्ही जे काम करतोय हे त्यांना आवडतं आणि त्यांना मराठी उद्योजकांना त्यांच्या वस्तू किंवा त्यांच्या सेवा खरेदी करून मदत करायची आहे त्यांनी समर्थक म्हणून जॉईन व्हा

 

जय शिवराय

शिवस्वराज्य मराठी संघटना ज्यांना समर्थक म्हणून विनामूल्य नोंदणी करायची आहे त्यांनी गुगल फॉर्म भरा.

 

शिवस्वराज्य मराठी उद्योजक समूह ज्यांना नियमित उद्योजक सदस्य म्हणून नोंदणी करायची आहे त्यांनी फॉर्म भरा, शुल्क भरून जॉईन होण्यासाठी प्रत्यक्ष फोन करा दादर ऑफिसला आवर्जून भेट द्या

https://docs.google.com/forms/d/1NvZI1WKWNbfKzaFqpfXXE_660i2qEg1vuYUMFkNRvLg/edit

 

जे मोठे व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर बिल्डर कारखानदार आहेत त्यांनी समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स जॉईन करा.

https://docs.google.com/forms/d/1XhYS3SUFYGel3KL8A2gd4SUwaxyvpxjKohasqaqiYdE/edit

 

शिवस्वराज्य उद्योजक चळवळीत सहभागी होण्यासाठी गुगल काम आवर्जून भरा

 

जय शिवराय

संजय यादवराव संस्थापक

शिवस्वराज्य मराठी उद्योजक समूह

समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स

 

Office No. C Block 119, 1st Floor, Ranjit Studio Compound, Dadasaheb Phalke Road, Dadar (E), Mumbai – 400014.

अधिक माहितीसाठी सोबत फोन नंबर दिला आहे

 

कार्यालय संपर्क :- 9004075995 / 8779842009 / 9082550774

 

संघटनेचे दरमहा उपक्रम

 

शिवस्वराज्य मराठी उद्योजक मावळे दरमहा उद्योग नेटवर्किंग बैठक आणि तज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर

 

आठवड्यातून किमान दोन ऑनलाइन मार्गदर्शन चर्चा सत्र

 

शेती पर्यटन हॉटेल उद्योग बांधकाम उद्योग फेरीवाला उद्योग विविध विषयात ऑफलाइन मार्गदर्शन शिबिरे

 

समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स प्रत्येक विभागाची स्वतंत्र व्यावसायिक बैठक मुंबई मुंबई उपनगर पुणे पिंपरी चिंचवड पालघर विभाग सुरू

 

सदस्यांसाठी स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप आणि यात नियमित व्यावसायिक चर्चा

 

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मराठी उद्योजक मावळ्यांचे संघटन निर्माण करण्याचा संकल्प यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे व्हाट्सअप ग्रुप सुरू

 

याच पद्धतीने शिवस्वराज्य मराठी उद्योजक समूहाचे उद्योजकता विकासाचे उपक्रम दरमहा राबवले जातात.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!