spot_img
spot_img
spot_img
spot_img

खाकी वर्दीतला माणुसकीचा देवमाणूस; एसटी महामंडळाचा अभिमान ठरले अनिल अलट

खाकी वर्दीतला माणुसकीचा देवमाणूस; एसटी महामंडळाचा अभिमान ठरले अनिल अलट

 

खाकी वर्दीतील कर्मचारी म्हणजे केवळ तिकीट देणारा कंडक्टर नव्हे, तर तो माणुसकी जपणारा संवेदनशील चेहराही असू शकतो, याचा हृदयस्पर्शी अनुभव रविवारी प्रवाशांना आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या अलीबाग डेपोतील कंडक्टर अनिल अलट यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे प्रवाशांच्या मनात एसटीबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला.

 

रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वळसंगहून पुण्याकडे निघालेल्या (गाडी क्र. एमएच 14 एमटी 7539) बसमध्ये प्रचंड गर्दी होती. जागा नसतानाही अनिल अलट यांनी वळसंगचे माजी सरपंच महादेव होटकर व त्यांच्या मुलीला दिलासा देत, “सोलापूर येथे सीट क्रमांक 7 व 8 रिकाम्या होतील, तेथे बसा. 5 व 6 या दिव्यांगांसाठी राखीव आहेत, तुम्हाला त्रास नको,” असे सांगून आश्वस्त केले. एवढेच नव्हे तर स्वतः पुढे येऊन बॅगा रॅकवर ठेवण्यासाठी जागा करून मदतही केली.

 

सोलापूर मार्गे अलीबागकडे धावणारी बस मोहोळ, टेंभुर्णी, मोडनिंब करत पुढे जात होती. सर्व जागा भरलेल्या असताना मोडनिंब येथे सुमारे ६० वर्षांच्या एका महिला बसमध्ये चढल्या. तिकीट तपासणीदरम्यान त्या महिला कंडक्टरच्या जागेवर बसल्या होत्या. तिकीट बुकिंग पूर्ण झाल्यानंतरही अनिल अलट यांनी त्या महिलेला उठवले नाही. उलट स्वतः बसच्या पायरीवर बसून तब्बल तीन तास हडपसरपर्यंत प्रवास केला.

 

कर्तव्य आणि माणुसकी यांचा सुंदर संगम म्हणजे अनिल अलट. “मी अलीबाग डेपोचा असून मूळचा यवतमाळचा आहे,” अशी साधी ओळख देणाऱ्या या देवमाणसाने खाकी वर्दीची खरी शान जपली. अशा संवेदनशील कर्मचाऱ्यांमुळे एसटी महामंडळाचा अभिमान अधिक उंचावतो, अशी भावना वळसंगचे माजी सरपंच महादेव होटकर यांनी व्यक्त केली.

 

मुख्य संपादक : दत्ता सुरवसे

Related Articles

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना

कोल्हापूर डीआयजी रंजन कुमार शर्मा यांचा सत्कार करताना सार्वजनिक गणेशोत्सव बैठकीचे आयोजन करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा मानसन्मान केला व तसेच एसपी साहेब...

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

आमचे स्वाभिमान, सोलापूरचे विकासरत्न,दमदार,आमदार मा.श्री.देवेंद्र दादा कोठे तसेच लोकप्रिय नगरसेवक मा.श्री.प्रथमेश दादा कोठे या दोन्ही दादासाहेबाना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..   दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!