spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्र. ०८ मधील भांडे गल्ली परिसरातील सार्वजनिक मुतारीच्या नूतनीकरणासाठी पाहणी

प्रभाग क्र. ०८ मधील भांडे गल्ली परिसरातील सार्वजनिक मुतारीच्या नूतनीकरणासाठी पाहणी

 

दुपारच्या सत्रात प्रभाग क्र. ०८ मधील भांडे गल्ली बाजारपेठ परिसरातील सार्वजनिक मुतारीची दुरवस्था असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर, सदर मुतारीच्या नूतनीकरणासाठी संबंधित सोलापूर महानगरपालिकेच्या अवेक्षकांसोबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान सदर मुतारीच्या नूतनीकरणासाठी तात्काळ प्लॅन व एस्टीमेट तयार करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

 

सदर सार्वजनिक मुतारी ही मुख्य बाजारपेठेत स्थित असल्याने येथे सध्या केवळ ०२ सीट उपलब्ध असून, विधीसाठी नागरिकांना नेहमीच प्रतीक्षेत थांबावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर जागेत ०४ पेक्षा अधिक सीट उपलब्ध करून देण्याचे तसेच शेजारील जागेत महिलांसाठी स्वतंत्र व बंदिस्त ०१ सीटचे स्वच्छतागृह उभारण्याबाबत प्लॅन व एस्टीमेट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अवेक्षक अभिजीत बिराजदार यांच्याकडे भांडे गल्ली येथील मुतारीच्या दुरुस्तीबाबत नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांनी मागणी केली होती. त्यावर संबंधित झोनकडून प्लॅन व एस्टीमेट पाठविण्यात यावे, तसे झाल्यास आवश्यक कार्यवाही निश्चितपणे करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले होते त्यानुसार, या भागातील आरोग्य निरीक्षक सोमनाथ सिद्धगणेश यांनी नगरसेवक गौरीशंकर उर्फ प्रविण दर्गोपाटील यांच्या सूचनेनुसार विभागीय कार्यालयास भांडे गल्ली मुतारी दुरुस्तीबाबतचे पत्र सादर केले. त्या अनुषंगाने आज सदर मुतारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

 

या परिसरातील व्यापाऱ्यांनी अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या मुतारीची वेळोवेळी सोमपा यंत्रणेकडून डागडुजी करून गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला होता. आता सदर मुतारीचे नव्याने नूतनीकरण करण्यात येणार असून महिलांसाठी स्वतंत्र सुविधेचीही व्यवस्था होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. बाजारपेठेची गरज आणि भविष्यातील सुविधा लक्षात घेऊन नूतनीकरणाच्या सूचना दिल्याबद्दल नगरसेवक प्रविण दर्गोपाटील यांचे व्यापाऱ्यांनी आभार मानले.

 

यावेळी नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, सोलापूर महानगरपालिकेचे अवेक्षक राहुल कांबळे, अवेक्षिका श्रीविद्या गुत्ती तसेच परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर विभाग

मल्लिनाथ शंकर शाबादी

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!