spot_img
spot_img
spot_img
spot_img

*होय हे सगळे आम्हीच सोलापूरकरांनी केले * महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विकास मंचचा ठाम इशारा : “विकासाचे श्रेय लाटाल तर जनतेसमोर उघडे पाडू”*

 

_गेल्या पाच वर्षांत सोलापूरच्या विकासासाठी केलेली ठोस कामगिरी आणि पुढील स्पष्ट कार्ययोजना — केवळ सोलापूर विकास मंचचीच_

 

सोलापूर | विशेष प्रतिनिधी :

येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांसमोर एक महत्त्वाची व स्पष्ट भूमिका मांडत सोलापूर विकास मंचने ठाम शब्दांत सांगितले आहे की, खाली नमूद केलेली सर्व विकासकामे केवळ आणि केवळ सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मार्गी लागलेली आहेत. जर कोणत्याही खासदार, आमदार किंवा महानगरपालिकेत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी ही कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न केला, तर सोलापूर विकास मंच त्या सर्वांना पुराव्यानिशी सोलापूरकरांसमोर उघडे पाडेल, असा स्पष्ट इशारा मंचच्या वतीने आज शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी हॉटेल ऐश्वर्या येथे रोजी संपन्न झालेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

 

गेल्या पाच वर्षांतील ठळक कामगिरी

सोलापूर विकास मंचने गेल्या पाच वर्षांत शहराच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकत आणि प्रशासनावर सातत्याने दबाव ठेवत खालील महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे :

 

👉🏻 *होटगी रोड सोलापूर विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करून दाखवली*.

👉🏻 *फक्त सोलापूरातून नव्हे तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील जनतेकडून गोवा आणि मुंबई विमानसेवेस प्रचंड प्रतिसाद मिळवून दिला*.

👉🏻 *५४ मीटर छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS Hospital तेथुन सोरेगाव रस्त्याच्या उभारणीसाठी यशस्वी प्रयत्न करून लवकरच त्याचा कार्यारंभ सुनिश्चित केला यासाठी निधी सुद्धा आणला*

👉🏻 *सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आकारण्यात येणारा सुपर टॅक्स कमी करण्यात यश मिळवले*.

👉🏻 *मृत जनावरांसाठी विद्युतदाहिनी प्रकल्प राबविला*

👉🏻 *हुतात्मा एक्सप्रेसच्या जनरल डब्यांची संख्या वाढविण्यासाठी यशस्वी लढा दिला तसेच रेल्वेसंदर्भातील इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले*.

👉🏻 *सोलापूर महानगरपालिकेतील विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश केला*.

👉🏻 *स्मार्ट सिटी प्रकल्पांची आरटीआयच्या माध्यमातून सखोल पोलखोल केली*.

👉🏻 *केंद्र सरकारकडून मिनी आणि मिडी इलेक्ट्रिक बसेस मंजूर करून आणल्या*.

👉🏻 *महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालय परिसराच्या सुधारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला*.

👉🏻 *सोलापूरात आय.टी. पार्क कार्यान्वित करण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली*.

👉🏻 *श्री अन्न उत्कृष्टता केंद्र (मिलेट सेंटर) हा २०० कोटी रुपयांचा प्रकल्प बारामतीकडे जाण्यापासून रोखून पुन्हा सोलापूरात यशस्वीपणे खेचून आणला*.

👉🏻 *जुळे सोलापूर महानगरपालिका / प्राधिकरण या संकल्पनेचा पाठपुरावा केला*.

👉🏻 *बेकायदेशीर स्पीड ब्रेकर हटविण्याचे प्रभावी अभियान राबविले*.

👉🏻 *नियमित पाणीपुरवठ्यासाठी आंदोलने करून महानगरपालिकेस अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला*.

👉🏻 *शहरांतर्गत जड वाहतूक समस्येतून सोलापूर शहराची मुक्तता करण्यासाठी ठोस प्रयत्न केले व यात यश संपादन केले*

👉🏻 *डीजे-डॉल्बी, लेझर आणि डिजिटल बॅनर नियंत्रणासाठी यशस्वी लढा दिला*

👉🏻 *सोलापूरातील भीषण पूरग्रस्त नागरिकांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप केले*.

👉🏻 *केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शहराच्या विकासासाठी नियमित बैठका व थेट संवाद साधला*

 

भविष्यातील कार्ययोजना

सोलापूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सोलापूर विकास मंच पुढील उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे :👇👇

 

👉🏻 होटगी रोड सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग, टेकऑफ व इतर आधुनिकीकरणासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर पाठपुरावा.

👉🏻 सोलापूरातील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणे.

👉🏻 सोलापूरात मोठ्या उद्योगांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने गुंतवणूक परिषद आयोजित करणे.

👉🏻 कंबर तलाव रेल्वे ब्रिज उड्डाणपुलाच्या रुंदीकरणासाठी ठोस प्रयत्न व मा नितीनजी गडकरी यांचे आदेश आणण्यात यशस्वी.

👉🏻 हिप्परगा तलावातील गाळ काढण्याचा प्रकल्प.

👉🏻 एस.टी. व रेल्वे सुविधांमध्ये मूलभूत सुधारणा.

👉🏻 शहरातील प्रलंबित उड्डाणपूल व बाह्यवळण मार्ग पूर्ण करून घेणे.

👉🏻 सार्वजनिक शौचालये व शहर वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजना.

👉🏻 सोलापूर–पुणे सहापदरी मार्गाची उभारणी.

👉🏻 बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न.

👉🏻 येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षांकडून स्वच्छ चारित्र्याचे, अभ्यासू, सुसंस्कृत व चरित्रवान उमेदवार देण्यासाठी सोलापूरकरांचा संघटित दबाव निर्माण करणे.

 

सोलापूर शहर व जिल्ह्यात नवीन उद्योग निमिर्ती करून व सोलापुरातील सुशिक्षित बेरोजगार मुला मुलींना गावातच उद्योग व नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न राहतील

 

*सोलापूर विकास मंचचा स्पष्ट संदेश असा आहे की, शहराच्या विकासासाठी राजकारणापेक्षा काम महत्त्वाचे आहे. श्रेयाच्या लढाईत नव्हे तर सोलापूरच्या भविष्यासाठी मंच लढत राहील — आणि खोटे श्रेय घेणाऱ्यांना सोलापूरकरांसमोर उघडे पाडले जाईल*.

 

*ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, प्रसन्न नाझरे, आनंद पाटील, भारत पाटील, शुभदा पाटील, सुधीर क्षीरसागर, प्रशांत भोसले, अर्जुन रामगिर, गणेश शिलेदार, मिलिंद कदम, सुनिल दुस्सल, वासुदेव आडके, घनश्याम दायमा, इक्बाल हुंडेकरी, विरेंद्र राचर्ला, अमोघसिध्द कोरे, अॅड. संजय मंटगे, योगिनाथ खानापूरे, संतोष कांबळे, नरेंद्र भोसले, प्रदीप जाधव, शिवकुमार देडे शाफुर काझी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते*.

 

दक्षता उपसंपादक:राजन क्षत्रिय

Related Articles

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश

*महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*   मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एन.एम.एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यालय बार्शी...

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश

अक्षय तृतीयेपूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्याचे निर्देश   सोलापूर : महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी आज महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या...

spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!